Whatsapp, Whatsapp messages

Whatsapp Marathi Jokes Free Download

Hello readers. Today here we present greatest and latest collection of Whatsapp Marathi Jokes Free Download to read share and enjoy with your friends to have a healthy happy life on this little life of this planet.

Whatsapp Marathi Jokes Messages {Msg SMS}

Whatsapp Marathi Jokes Messages {Msg SMS}

जगामधील सगळ्या पुरुषांपेक्षा मराठी पुरूषांवर ऐक जास्तीची जबाबदारी असते
“तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करणे”

पप्पू आणि पप्पा :
पप्पू: पप्पा तुम्ही भूतांमध्ये विश्वास ठेवता काय हो ..??
पप्पा : नाही रे वेड्या .. भूत बित तसलं काय नसत या जगात …
पप्पू: मग आपली कामवाली म्हणत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून
पप्पा : चल सुटकेस मध्ये आपले कपडे भर …
पप्पू: प . पण का पप्पा ….???
पप्पा : आपल्याकडे कोणतीच कामवाली नाहीये.

whatsapp marathi jokes free download

भिकारी :- दादा,
काहीतरी खायला द्या..
तोताराम :- टमाटे खा…
भिकारी :- पोळी नाहीतर
शिळा भात द्या दादl.!
तोताराम :- टमाटे खा…
भिकारी :- बरे,टमाटे
खाऊ घाला.
तोतारामची बायको (बाहेर येऊन ):- अरे , हे
तोतरे बोलतात …
तुला सांगताहेत कि कमाके खा.!
अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमची सायकल बाहेर काढली.
ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून
तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’
अनुप: ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’
तो: ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’

मुलीचा whatsapp status – My Life My Rulezzz
मुलगा – Movie ला येणार का….??
मुलगी – घरातले नाय सोडणार…
असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही?
वास्को -द- गामा!
हा पाउस जर वेळो-अवेळी असाच सारखा पडत राहिला तर …
काही वर्षानी आपल्यापेक्ष्या लहान असलेली मूल पण म्हणतील..
“आम्ही पण तुमच्या एवढेच ‘पावसाळे’ बघितलेत..

whatsapp messages jokes in marathi

नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.’

whatsapp messages jokes in marathi

जावईबापू , पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ?
जावई – भिंतीवरची पाल ….
तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते !
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे.
रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका- गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
पेशंट – विचित्र आजार झालाय..
जेवणानंतर भूक लागत नाही..
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही..
काम केल्यावर थकवा येतो..
काय करू..??
डॉक्टर – रोज रात्री उन्हात बसा..

एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा – अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!

whatsapp marathi jokes facebook

एक बाई कपडे धुताना दुसरीला- तू वापरते तोच साबण मीही वापरते, मग तुझ्या नवर्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे?
दुसरी- अग, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते.. म्हणून!

मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, “कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग.”
“माहीत नाहीत सर.”
दादू म्हणाला. “माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा.
परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!” शिक्षकांनी आज्ञा दिली.
दादूनं पुस्तक काढून वाचल, “यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?”
शिक्षकांनी विचारलं. “हे तर माहीत होतं मला,” “मग माहीत नाही असं का म्हणालास?”
शिक्षक रागावले. “मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!

whatsapp marathi jokes new

बायकोला थोबाडीत
मारुन नवरा म्हणाला,—
“पुरूष तिलाच
मारतो जिच्यावर
तो प्रेम करतो”…….
बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे
फटके मारुन
म्हणाली, ——-
“तुम्ही काय
समजता,की माझं
तुमच्यावर प्रेम
नाही?……

राजू आपल्य वडिलांना म्हणत होता,
“पप्पा, केशवसुत कोण होते हे?”
“केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला?
इतिहासाच पुस्तक आण तुझं,
आता सांगतो” वडील म्हणाले.

बुलेटराजा मध्ये बुलेट चा रोल सैफ करतोय..
तर सोनाक्षी बुलेट ५०० cc चा रोल करतीये..
एका मराठी लेखकाच्या आत्मचरित्रांच प्रकाशन झाल्यावर आठच दिवसांनी त्यांची मुलाखत घेणाऱ्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला,
“आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?”
“दोन हजार शत्रू,” लेखक महोदय म्हणाले!

Whatsapp Marathi Jokes Messages {Funny Msg SMS}

marathi jokes on whatsapp

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या…एवढंच ना.
पंप्या : हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

whatsapp marathi funny jokes

एकदा जंगलातुन ऐक शेळी आणि तीचे पिल्लू निघाले होते तेवढ्यात समोरून वाघ आला पिल्लू घाबरून लपून बसले.
वाघ शेळीला म्हणाला घाबरू नकोस मी काही करणार
नाही. तुझे बरे चालले आहे ना? वाघाने पिल्ला बोलावले, शाळेत जातोस का नाही अशी विचारपूस
केली आणि वाघ निघुन गेला.
पिल्लाने आईला विचारले आई वाघ आला आणि आपल्याला काहीच न करता, न खाता निघून गेला, असे कसे काय?
.
.
.
.
.
ह्यावर शेळी म्हणाली ” ह्याचा अर्थ एकच की जंगलाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत.”
कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते…
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!

whatsapp marathi jokes images

whatsapp marathi jokes images

चिंगी : जानु…..
सोमवारी shoping,
मंगळवारी hotel,
बुधवारी firayla,
गुरुवारी jevayla,
शुक्रवारी movie &
शनिवारी picnic ला…
किती मस्त मज्जाच मज्जा…..
चंप्या : हो… आणि सोमवारी सिद्धविनायकाला…
चिंगी : कशाला ???
चंप्या : भिक मागायला…..

कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
…काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.

whatsapp marathi non veg jokes

एक तरूण पहिल्यांदा सासुरवाडी
ला जातो. तिथे त्यांचे स्वागतही मस्त
होते.
पण दुपारी जेवणात त्याला न
आवडणारी “मेथी”ची भाजी असते.
पहिलाच दिवस, म्हणू बिचारा गुपचुप
खातो…
सासूबाई वरून कौतुकाने सांगतात…
“आमच्या मळ्यातली ताजी भाजी
आहे ही.”…!!
रात्री पुन्हा जेवणात पाहतो तर काय…
मेथीचे पिठले..!!
एकदा पत्नीकडे पाहत… गपगुमान
गिळतो. upset emoticon
दुसर्‍या दिवशी दुपारी पुन्हा मेथीचे
वरण…!! colonthree emoticon
आता मात्र “आटा” सरकायला devil emoticon
येवूनही बिचारा संयम बाळगतो.
सायंकाळी मात्र तो स्वतःच सासू
बाईना सांगतॊ…
“रात्रीचा माझा स्वयंपाक करू नका….!”

तुमचा तो मेथीचा मळा कुठे आहे तेवढं सांगा…
.
.
.
.
.
.
.
.
.
मीच तिथे जाऊन “चरून” येतो
प्रियकर – प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी – काय करशील?
प्रियकर – तू सांगशील ते करीन!
प्रेयसी – मग आधी नोकरी कर.
प्रियकर – का?
प्रेयसी – म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!
बस स्टाँपवर एक देखणी तरूणी उभी होती.
तिची छेड काढताना एक तरूण म्हणला,
“चंद्र तर रात्री उगवतो. आज तर दिवसाच उगवला वाटतं.” wink emoticon
:
:
:
” हो ना…. घुबडसुध्दा रात्रीच फिरत असतं. आज दिवसा स्टँडवर कसं ?”
एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते ” तुझा पोपट झालाय , चल फूट इथून ”
संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो
“मी आलोच नव्हतो ”
रमेश : काय रे नवीन मोबाइल वाटत
सुरेश : नाही रे gf चा उचलून आणलाय.
रमेश : का रे?
सुरेश : ती नेहमी बोलते तू माझा फोन उचलतच नाहीस…
मग आणला आज सुमडीत उचलून…..
बसू दे शोधत
रामू – ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू – शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू – गा S S णे!
राजू – अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू – दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…

चंप्या आईला – आई मी इतका मोठा कधी होईल की मी माझ्या मर्जीने कुठेपण जाऊ शकेल..
चंप्या च्या आईने प्रेमाने उत्तर दिलं.
” बेटा..इतका मोठा तर तुझा बाप पण नाही झालाय अजुन”

marathi non veg jokes for whatsapp

पुण्यातल्या पोरीला बर्थ डे गिफ्ट काय द्याल ????.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१ डझन स्कार्फ :) :)

whatsapp marathi jokes download

शंट: डॉक्टर, मला वात आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टर: मग पेटव की..

मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..

‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते.
पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’
तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला..’
उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?

शिक्षक: I LOVE U चा शोध कोणी लावला?
.
विद्यार्थी: चायनाने
.
शिक्षक: कस काय?
.
विद्यार्थी: I Love You याची­
काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चला तो चांद तक…. नही तो शाम तक….

कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,

मॅडम तुमची हि साडी परत ह्या,

मॅडम : अरे पण का?

गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
करतो…

Marathi funny Poem

अखेर त्या दिवशी देवाने custmer care सुरु केले
तक्रार करता यावी म्हणून फोन नंबर दिले

सकाळपासून तक्रारीचा पूरच वाहत होता
दर सेकंदाला तिथला टेलिफोन खणऽखणऽऽत होता

“नशिब माझे कसे देवा पैसा मिळत नाही
बायको मला कशी दिली ती माझे ऐकत नाही

म्हैस हरवली चार दिवसाने अजून सापडत नाही
दहा वर्ष झाली लग्नाला अजून मुलगा नाही

नोकरीत बढती मिळेल देवा अशी तजवीज करा
मुलगा शिकतो इंजिनिअरिँग ला त्यालाही पास करा

सर्वाँना गाड्या आहेत मलाच तेवढी नाही
आम्हाला अजून घर नाही त्याचीही दखल घ्यावी

सर्वाँना “गोरे” बणवले मग माझ्यावरच का कोपला होता
माझ्यावेळीच तुझ्याइथला का देवा “रंग” संपला होता?

सासू कसली खट्याळ इतकी देवा तु मला दिली
घेऊन जा तिला एकदा अजून वेळ नाही का झाली?

सुनेला काही वळणच नाही तिला जरा अद्दल घडव
जावई माझा “दशमग्रह” त्याला माझ्या पाया पडव

संपत्ति वाटताना देवा तु पक्ष:पाती झालास
इतरांना श्रीमंत करुन मलाच गरीब केलंस

यंदाच्या निवडणूकीत खुर्ची तेवढी मिळूद्या देवा
जनतेच्या जनार्धनाला या करुद्या थोडीसी सेवा

सर्व दुःखे देवा काय तु माझ्या वाट्यास लिहली
सुखाची पाने नाही का नशिबी माझ्या ठेवली?

सृष्टिचा कारभार देवा तुम्हाला नीट चालवता येत नाही
तुम्ही असताना भूकंप,त्सुनामी,दुष्काळ का तो येई

का इथली मुले देवा उपाशी पोटी झोपतात
थंडीने गारठून का ती तिथेच जीव सोडतात

भ्रष्टाचार इथला देवा तु का थांबवत नाही
स्रीयांवरच्या अत्याचाराला लगाम का लावत नाही”

अशा तर्हेने अनेकांनी देवाला फोन केले
प्रत्येकानी त्याच्या परीने जाब विचारुन घेतले

सर्वाचे म्हणने देवानी शांतपणे ऐकून घेतले
स्मितहास्य करुन थोडेसे,उत्तर देवांनी दिधले

“आतापर्यत तुझ्या वाचेने जे जे तु वदलास
या सर्वाँचा का कधि तु विचार मनी केलास?

दिधला मी तुज हा अमूल्य देह मानवाचा
ईच्छाशक्ति, स्वातंत्र्य,सामर्थ्य अन् कर्तृत्वाचा

तुझ्या कर्मयोगाने तु जीवन सुंदर बनवशील
वाटले न मज तु स्वार्थी,भोगी रडका बनशील

यंत्रासंगे संवेदना ही तुझ्या बधिर झाल्यात
बलात्कारी,मूढ मुर्खा बेशर्म तू झालात

बेलगाम वर्तनाने तुझ्या तु समस्या निर्माण केल्या
शोधता उत्तर प्रश्नाचे तू प्रश्नांतच अड़कला गेला

नात्यातल्या भावनेचा ओलावा तुला कळला नाही
मानव्याने कसे जगावे हे ही समजले नाही

या सृष्टिच्या सौंदयाशी सुर तुझे कधि जुळले नाही
ओरबाडणे जमले तुला ममत्व समजले नाही

दोषारोप करणे दुसर्यावर हा स्वभाव तुझा बणला
स्वत:च्या आत डोकावून बघ त्यामुळेच तु पुरता खंगला

नव्या दमाने उभा रहा तु कर्तृत्वाची कास धर
या सृष्टीवर प्रेम कर अन जीवन सुंदर मग बघ!”

एवढे सगळे ऐकून देवाचे मानव खजील झाला
“चुकलेच देवा थोडेसे माझे पण अजून वेळ न गेला

जगण्याला मी बनवीन सुंदर या सृष्टीवर प्रेम करीन
मानवता ह्रदयात बाणूनी खरा मानव मी होईन”

झोपेतच हसत हसत बंडूने देवाला नमस्कार केला
“उठ ना रे बंड्या लवकर!”आईने आवाज दिला.

—राजेश खाकरे

whatsapp marathi jokes status

दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:
:
:
:
:
:
“आयच्या आयची आय ब्यांक ”
संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती….
संता : ओह्ह… माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.

बंड्या रोज चिंगीच्या घरासमोर तासन् तास उभा रहात असे. चिंगीनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही.
पण नंतर चिंगी ला तो आवडायला लागला. पण तो फक्त ऊभा रहायचा. बहुतेक विचारायला घाबरत असेल म्हणून चिंगीच त्याला एक दिवस म्हणते, अजुन किती दिवस असा तरसवणार ? विचारुन टाक माझं उत्तर हो असेल.
त्यावर बंड्या म्हणाला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ओ ताई…. असं काही नाही आहे. तुमच्या wi-fi ला पासवर्ड नाही आहे. फ्री मध्ये नेट वापरायला मिळतं म्हणून येथे थांबतो रोज….

पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.
आजकाल पालकांना एकच चिंता लागलेले असते, ती म्हणजे
.
.
.
.
.
आपला मुलगा काय ‘डाऊनलोड’ करतोय;
.
.
आणि
.
.
आपली मुलगी काय ‘अपलोड’ करतेय….

मराठी भाषा…!!
मराठी भाषा फारच अजब आहे ना…??
….गाडी ‘बिघडली’ असेल तर म्हणतात ‘बंद’ आहे.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात ‘चालू’ आहे…….
एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??
बायकॊला “बडबड बंद कर” असं कधीच न सांगता
“ऒठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसतेस” म्हणा.
काँलेज मध्ये एक नवीन मुलगी येथे .
मुलगा :- तुझे नाव काय …?
मुलगी :- मला सगळे”ताई”म्हणतात ।।।
मुलगा :- आइला ,
काय योगा योग आहे ..
मला पण सगळे”दाजी”म्हणतात ….

Incoming Searches:

,whatsapp marathi jokes free download
,whatsapp marathi jokes download
,whatsapp marathi jokes facebook
,whatsapp marathi jokes status
,whatsapp marathi jokes images
,marathi non veg jokes for whatsapp
,whatsapp marathi non veg jokes
,whatsapp marathi jokes new
,whatsapp marathi funny jokes
,whatsapp jokes in marathi
,whatsapp non veg jokes in marathi
,whatsapp messages jokes in marathi
,marathi jokes on whatsapp

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *